मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सातारा व औरंगाबाद जिल्हा दौर्यावर आहेत. मात्र, आज सकाळी मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणार्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला आहे. उड्डाणापूर्वीच बिघाड उघड झाल्याचे लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला;परंतु या बिघाडामुळे मुख्यमंत्र्यांच्या नियोजित सातारा दौर्याला विलंब झाला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे जाणार होते.
सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री
तिथे पोहोचणार होते;पण हेलिकॉप्टरमध्ये
तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांच्या दौर्याला उशीर झाला. मुख्यमंत्र्यांच्या
हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. दोन वर्षातील
ही सहावी घटना आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे 25 मे 2017 रोजी हेलिकॉप्टर
कोसळले होते. या अपघातातून मुख्यमंत्री फडणवीस बालंबाल बचावले होते.